कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये,असं अनेकदा सांगितलं जातं कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं. पाण्याचं जास्त प्रमाण असल्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर त्यावर आणखी पाणी पिऊ नये. अनेक फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला जठरासंबंधी समस्या जाणवू शकतात. पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. अन्न किंवा फळांवर जास्त पाणी प्यायल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. ज्यामुळे अन्न पचन होण्याऐवजी अन्न आणि पाण्याचं मिश्रण होतं. फळं खाल्यावर तासाभराणे पाणी प्यावे.