‘किस डे’ हा व्हॅलेंटाइन वीकचा सर्वात रोमँटिक दिवस मानला जातो.
या दिवशी लोक त्यांच्या जोडीदाराचे किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे चुंबन घेतात त्यांचे प्रेम देखील व्यक्त करतात.
पण तुम्हाला माहित आहे का की, चुंबन घेणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे?
चुंबन घेताना शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते, तेव्हा व्यक्तीला तणावमुक्तही वाटते.
एका प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आंद्रिया डिमिर्झिओन म्हणतात, 'चुंबन आपल्या हृदयाचे ठोके वाढवून रक्तवाहिन्या विस्तृत करते. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे, रक्त प्रवाह वाढतो आणि रक्तदाब लगेच कमी होतो.’
रक्तवाहिन्या विस्तारून आणि रक्त प्रवाह वाढल्याने शारीरिक त्रासही दूर होतो. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे रक्तदाब कमी झाल्यास डोकेदुखीसारख्या समस्याही दूर होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एका रिपोर्टनुसार, रोमँटिक किसिंगचा अनुभव शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीशी देखील संबंधित आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होऊ शकतो.
चुंबन घेताना आपल्या शरीरातील कॅलरीज जलद बर्न होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका मिनिटाच्या चुंबनाने 2 ते 26 कॅलरीज कमी होऊ शकतात. अर्थात, वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम फॉर्म्युला मानला जाऊ नये, परंतु हे खरे आहे की, यामुळे अतिरिक्त कॅलरीज कमी होतात.