बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर क्वचितच बोल्ड अवतारात पाहायला मिळते. पण काही काळापासून तिने तिचे बोल्ड फोटो इंटरनेटवर शेअर करायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा एकदा तिने व्हाईट कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती फॅशनची झलक दाखवत आहे. सध्या भूमी पेडणेकर तिच्या 'बधाई दो' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 11 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.