रसिकांच्या मनावर राज्य करणारा सदाबहार गायक किशोर कुमार. गायक, अभिनेते किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी. किशोर कुमार हे लेखक, निर्माते, पटकथा लेखक होते. अवघ्या 57व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गायनासाठी त्यांना आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. दोन हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली. 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. किशोर कुमार यांनी सर्व प्रकारची गाणी गायली. त्यांच्या आवाजाची जादू काही वेगळीच होती. आवाजाच्या माध्यमातून किशोर कुमार घराघरात पोहोचले.