आज म्हणजे 13 सप्टेंबर रोजी देशभरात ‘करवा चौथ’चा (Karwa Chauth 2022) सण साजरा केला जात आहे. या खास दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहूनच उपवास सोडतात.



यंदा बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा माहोल होता. अनेक जोडप्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.



बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यंदा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत.



यंदा अंकिताचा देखील पहिलाच करवा चौथ आहे. अभिनेत्री हा सण देखील मोठ्या थाटात साजरा करणार आहे.



टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना देखील तिचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहे. करिश्मा तन्ना हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.



बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिचे नाव देखील चर्चेत आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. यंदा अभिनेत्री आपले पहिले करवा चौथ व्रत ठेवणार आहे.



अभिनेत्री आलिया भट्टने यावर्षी 14 एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले. त्यामुळे यंदा त्यांचा पहिला करवा चौथ असणार आहे.



छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय हिने देखील या वर्षी जानेवारीमध्ये तिचा बॉयफ्रेंड-बिझनेसमन सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्नगाठ बांधली. यावेळी मौनी रॉयचाही पहिला करवा चौथ आहे.