साऊथमधून बॉलिवूडमध्ये वळलेली अभिनेत्री पूजा हेगडे आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.



13 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईत जन्मलेल्या पूजाने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात आपली हक्काची जागा निर्माण केली.



पूजाला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. या छंदामुळे तिला मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.



अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या अभिनय कारकिर्दीला तमिळ आणि तेलुगु चित्रपटांतून सुरुवात केली. तिला पहिला चित्रपट ‘मुगामुडी’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटातूनच पूजा साऊथ इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय झाली.



यानंतर अभिनेत्रीने सातत्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. पूजा हेगडे तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते.



‘मोहेंजो दारो’ या चित्रपटातून पूजाने बॉलिवूड डेब्यू केला. हा चित्रपट 2016मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकला होता. मात्र, हा चित्रपट फार काही कमाल करू शकला नाही.



पण, या चित्रपटानंतर तिला अनेक मोठ्या चित्रपटात काम मिळू लागले. यानंतर तिने अक्षय कुमारसोबत ‘हाउसफुल 4’मध्येहे काम केले.



पूजाने तिच्या 10 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकूण 17 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांचा समावेश आहे.



वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, पूजा 'किसी का भाई किसी की जान'मध्येही दिसणार आहे. हा सलमान खानचा चित्रपट आहे, ज्यामध्ये राघव जुयाल, शहनाज गिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.