अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या क्लासी लूकनं नेहमी नेटकऱ्यांची मनं जिंकते. मिथिलानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यलो आणि पिंक कलरची साडी, स्टोनचे कानातले आणि हातात रिंग अशा लूकमधील फोटो मिथिलानं शेअर केले आहेत, मिथिलाच्या या पोस्टला प्रजक्ता कोळीनं कमेंट केली आहे. मुरंबा, कट्टी बट्टी, चॉपस्टिक्स या चित्रपटांमध्ये मिथिलानं काम केलं. तिच्या लिटील थिंग्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मिथिला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो मिथिला शेअर करते. मिथिलाच्या सोशल मीडियावर पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. मिथिलाच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.