बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. कियारा अडवाणी, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर स्टारकास्ट असणारा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट 16 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सध्या कियारा तिच्या आगामी गोविंदा नाम मेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये डेनिम कॉर्सेट टॉप, ब्लॅक फॉक्स लेदर पँट आणि हाय हिल्समध्ये फारच ग्लॅमरस दिसत होती. अभिनेत्री कियारा अडवाणीने बॉलिवूडसह तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. कियाराने 2014 साली 'फुगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया अडवाणी असं आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी कियाराने नावात बदल केला. कियारा 2016 साली 'एम. एस. धोनी' चित्रपटामध्येही झळकली होती. अलिकडेच कियारा अडवाणी अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'भुलभुलैया 2' आणि 'जुग जुग जियो' चित्रपटात झळकली होती.