तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिक आर्यन आज 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिकने त्याच्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. कार्तिकने आजवर एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचे नाव कार्तिक तिवारी असे होते. कार्तिकने 2011 साली 'प्यार का पंचनामा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. कार्तिकचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. कार्तिक आर्यनचा 'भूल-भुलैया 2' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कार्तिक आर्यन गेली 11 वर्ष सिनेसृष्टीत काम करतो आहे. कार्तिकचा 'फ्रेडी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.