अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नुकत्याच रिलीज झालेल्या 'यशोदा' च्या यशाने भारावून गेली आहे. चाहत्यांकडून यशोदामधील समंथाच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. आता यशोदाच्या यशानंतर समंथाने सोशल मीडियावरून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाने मी चंद्रावर गेली आहे असे समंथाने म्हटल आहे. समांथाने ट्विटरवरून प्रेक्षकांचे आभार मानले. प्रिय दर्शकांनो यशोदासाठी तुम्ही केलंलं कौतुक आणि प्रेम ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे, असे समंथाने म्हटले आहे. मी आनंदाने आणि कृतज्ञतेने भारावून गेले आहे. थिएटरमध्ये तुमच्या शिट्ट्या ऐकणे हे सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचा पुरावा आहे, असे समंथाने म्हटले आहे. समंथाचा 'यशोदा' 11 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. यशोधामध्ये सामंथा एका सरोगेट आईच्या भूमिकेत आहे. यशोदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यशोदाच्या यशानंतर समंथा खूपच खुश आहे.