बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरनं नुकतेच तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत . हाय स्लिट ड्रेस, हाय हिल्स अन् मोकळे केस अशा लूकमधील फोटो भूमीनं शेअर केले आहेत. भूमीनं हा लूक दुबईमधील एका पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता. फोटोमध्ये भूमी तिचा ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसली. भूमीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. भूमीनं बधाई दो या चित्रपटात काम केलं. तसेच तिचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भूमीच्या 'दम लगा के हाइशा' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. भूमीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.