Kia Motors ची SUV Seltos ला भारतात चांगलं यश मिळालं. आता याचा फेसलिफ्ट व्हेरिएंट येत आहे. कंपनी 2022 च्या मध्यात ही कार लॉन्च करू शकते. यात सहा एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स मिळणार. कंपनी या SUV मध्ये नवीन टर्बो डिझेल इंजिन देऊ शकते. जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनशी जोडलेले असेल.