मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस नदीत कोसळल्याने अपघातात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची आहेत सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. खरगोन ठिकरी महामार्गावर हा अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील डोंगरगाव येथे पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून अपघाताची कोणतीही माहिती अधिकृतरित्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा