दाक्षिणात्या स्टार यशचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट 15 एप्रिल रोजी रिलीज झाला.



चित्रपटामध्ये यशसोबतच संजय दत्त ,मालविका अविनाश,श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.



केजीएफ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.



यशच्या या चित्रपटानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केलेले रेकॉर्ड्स तोडले आहेत.



तरण आदर्शनं शेअर केलेल्या पोस्टनुसार टायगर जिंदा है, पिके आणि संजू या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकोर्ड केजीएफ-2 नं तोडले आहेत.



केजीएफ-2 या चित्रपटानं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधित कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.



केजीएफ-2 या चित्रपटाचं वर्ल्ड वाईड 926.67 कोटी एवढे कलेक्शन केले आहे.



चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं आतापर्यंत 343.13 कोटी रूपयांची कमाई केली आहे.



भारतामध्ये या चित्रपटानं 673.40 कोटी एवढी कमाई केली आहे.



'केजीएफ 2' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.