दह्यामध्ये असे गुणधर्म आहेत जे शरीराला थंड ठेवतात. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते.



कलिंगडात 90% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.



टरबूज हे उन्हाळ्यातील एक खास फळ आहे. त्यात 90% पर्यंत पाणी असते आणि ते पचायला सोपे असते.



संत्र्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. संत्र्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते जे उन्हाळ्यात आवश्यक मानले जाते.



तुम्ही दही, ताक किंवा रायतामध्ये पुदिना मिक्स करू शकता. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.



उन्हाळ्यात लिंबू पाण्यामुळे तुमचे शरीर थंड राहते आणि तुम्ही ताजेतवाने राहता.



काकडीचा वापर सॅलड, ज्यूस, डिटॉक्स ड्रिंक्स आणि रायतामध्ये करता येतो. त्यामध्ये 90% पर्यंत पाणी असते.



नारळ पाणी हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय आहे. नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक असतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.