अनेक लोक कित्येक तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या स्क्रिनसमोर काम करतात.



आठ ते नऊ तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या स्क्रिनसमोर बसून तुम्ही काम करत असाल, तर तुमच्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.



डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करु शकता



कापसावर गुलाब पाणी टाकून तो कापूस रात्री झोपताना डोळ्यांभोवती फिरवा.



आहारात गायीच्या तुपाचे सेवन तुम्ही करु शकता. ज्यामुळे दृष्टीसाठी चांगली होते.



रोज रात्री झोपण्याआधी स्वच्छ पाणी डोळ्यांच्या बाहेरी बाजूला लावा.



रात्री झोपण्यापूर्वी नाभीला मोहरीचे तेल लावल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे दृष्टी चांगली होते.



बडीशेप खाल्ल्याने डोळ्यांवरील ताण कमी होतो.



सकाळी गवतावर पडलेल्या दव-थेंबांवर रोज अनवाणी चालत राहिल्यास डोळ्यांची दृष्टी चांगली होते, असंही म्हटलं जातं.



दृष्टी सुधारण्यासाठी त्रिफळा चुर्ण आठवड्यातून दोन वेळा खावे.