थंडीच्या दिवसात हमखास सांधेदुखी आणि संधीवाताचा त्रास जाणवतो. बहुतेक वृद्धांसाठी हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो. पण अनेक वेळा वेदनांची समस्या फक्त हवामानामुळेच नाही तर तुमच्या आहारावरही अवलंबून असते. अनेकांना सांधेदुखीमध्ये सूज आणि वेदना होण्याची समस्या जाणवते. ही समस्या दूर करणे आवश्यक आहे. नाहीतर या या वेदना आणि सूज कालांतराने वाढते. त्यामुळे चालणेही कठीण होते. संधिवात समस्यांचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये ऑस्टियोआर्थराइटिस हा सर्वात सामान्य प्रकार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही अन्न आणि पेयांचे सेवन केल्याने संधिवाताची समस्या, सूज आणि वेदना वाढवू शकतात. जर या गोष्टींची योग्य वेळी काळजी घेतली नाही आणि याचे सेवन कायम ठेवल्यास संधिवात असलेल्या लोकांची समस्या वाढण्याचा धोका वाढतो. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जेवणात मीठ किती आहे याचीही काळजी घ्यावी लागते. संशोधकांच्या मते, उच्च सोडियमयुक्त आहार घेतल्यास संधिवात आणि ऑटोइम्यून रोगांचा धोका वाढू शकतो. सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांकडून आहारात मिठाचे प्रमाण कमी करण्याचाही सल्ला दिला जातो.