बहुतेक लहान मुलांना माती खाण्याची सवय असते.लहान मुलांची ही सवय सोडवताना पालकांची मात्र नाचक्की होते.



तर ही फार चिंताजनक बाब आहे. तुमच्या मुलांची माती खाण्याची सवय वेळीच बदलणे आवश्यक आहे.



याचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. माती खाल्ल्याने मुलांना बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.



इतकेच नाही तर त्यांना पोटाशी संबंधित गंभीर आजारही होऊ शकतात.



शरीरात कॅल्शियम आणि लोहाच्या कमतरतेमुळे मुलांना माती खाण्याची सवय लागते.



काहीवेळा खाण्यासंबंधित विकारामुळे ही सवय लागते. तर काही वेळा मुले कुतूहलामुळे माती खायला सुरुवात करतात.



लहान मुलांच्या या सवयीला वेळीच आळा घातला नाही, तर यामुळे अनेक गंभीर समस्यांना तोंड देण्याची वेळ येईल.



मुलांना अन्नपदार्थ देताना त्यांच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होईल याची काळजी घ्या.



मुलांना नॉन-फूड आयटम देऊ नका. लहान मुलांना पोषक तत्त्वे नसणारे अन्नपदार्थ देणे टाळा.



मुलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली की त्यांना मातीची चव आवडू लागते.



मुलांनी माती खाऊ नये, यासाठी त्यांना पुरेसे कॅल्शियम असेल, अन्नपदार्थ खायला द्या.



डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कॅल्शियमची औषधेही दिली जाऊ शकतात.