आजच्या धावपळीच्या जीवनात फ्रिजमुळे अन्न साठवणे सोपे झाले आहे. आठवड्यात सुट्टीच्या दिवशी आपण भाजी विकत घेतो आणि फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. हिवाळ्यामध्ये काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत. त्यामुळे या भाज्यांवर परिणाम आणि यामुळे आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते. आरोग्यतज्ज्ञांचे मते, थंडीच्या मोसमाच फ्रिजमध्ये ठेवलेल्या काही भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या अशा कोणत्या आहेत आणि त्यांच्या शरीरावर काय वाईट परिणाम होतो लसून खोलीमधील तापमानातही बरेच दिवस ताजी आणि सुरक्षित राहते. लसूण सोलून किंवा बारीक करून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामधील पोषक तत्वे कमी होतात. बहुतेक वेळेस आपण आले-लसून पेस्ट बनवून किंवा लसून सोलून आणि कापून ती फ्रिजमध्ये ठेवतो. याचे सेवन आरोग्यासाठी घातक आहे. हिवाळ्यात काकड्या विकत घेतल्यास त्या फ्रीजमध्ये ठेवू नका. काकडी खोलीमधील सामान्य तापमानावर ठेवा, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, ती फ्रिजमध्ये ठेवल्यावर ती अधिक थंड होते. हिवाळ्यात अशा थंड काकडीचे सेवन नुकसानदायक ठरेल. हिवाळ्याच्या हंगामात टोमॅटोही सामान्य तापमानावर टोमॅटो ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलते. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, पोत आणि रंगही बदलतो. बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते कारण भाजी कोणतीही त्या भाजीमध्ये बटाटा मिसळता येते. बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. यामुळे शरीरातील ग्लुकोजच्या पातळी आणि लठ्ठपणा वाढण्याचाही धोका असतो.