आपल्याला जर नेहमी निरोगी राहायचं असेल तर त्यासाठी व्यायाम करण्याची गरज आहे.

धावणे किंवा चालणे याद्वारे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता.पण या दोघांमध्ये शरीरासाठी नेमकं चांगलं काय

चालण्याचे फायदे
आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणे चांगले आहे. यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सतत चालावे. ताणतणाव,चिंता,झोप न लागणे, एकाग्रता नसणे इत्यादी गोष्टी यामुळे दूर होतात.

आजारी आणि वृद्ध व्यक्ती जे जास्त व्यायाम करू शकत नाहीत त्यांना चालण्यामुळे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

धावण्याचे फायदे
चालण्याप्रमाणेच धावण्याचेही अनेक फायदे आहेत. सध्या जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण फारच वाढत चालले आहे.

अशा वेळी वजन कमी करण्यासाठी धावणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

धावण्याने भरपूर कॅलरी आणि फॅट बर्न होते आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणे हा एक चांगला व्यायाम असल्याचे सिद्ध होते.

यासाठी चालणे आणि धावणे हे दोन्ही व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचेच आहेत.

मात्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार योग्य व्यायम पद्धत निवडणं गरजेचं आहे.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.