अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनीत ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट शौर्य चक्र विजेत्या पहिल्या महिला लढाऊ पायलट गुंजन सक्सेना यांचा बायोपिक आहे.



गुंजन या देशातील पहिल्या महिला फायटर पायलट आहेत, ज्या भारतीय सैन्यासोबत युद्धात उतरल्या होत्या. कारगिल युद्धात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.



नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट कारगिल युद्धाचे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे.



चित्रपटात कॅप्टन बत्रा यांच्या बालपणापासून ते कारगिल युद्धात शहीद झाल्यापर्यंतची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे.



2011मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता शाहिद कपूरचा ‘मौसम’ हा चित्रपट देखील काहीसा काल्पनिक असला, तरी त्याला कारगिल युद्धाची पार्श्वभूमी होती.



‘मौसम’ या चित्रपटात एका सैनिकाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. त्याचा साखरपुडा होत असतानाच कारगिलमध्ये युद्ध सुरु झाल्याने त्याला सीमेवर परतावे लागते. देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या या सैनिकाची कथा प्रेक्षकांना आवडली होती.



बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अभिनीत ‘लक्ष्य’ हा चित्रपट देखील कारगिल युद्धाच्या कथेवर आधारित होता. ‘लक्ष्य’ हा चित्रपट जरी काल्पनिक असला, तरी याला कारगिल युद्धाची पार्श्वभूमी होती.



‘लक्ष्य’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि अभिनेत्री प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. यात एका सैन्यात भरती होणाऱ्या मुलाची कथा सांगितली गेली आहे.



दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटात या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे.



‘एलओसी कारगिल’ चित्रपटात अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी, सैफ अली खान, अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आजची हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात.