चंद्रमुखी सिनेमामुळे अमृता खानविलकर अजूनही बरीच चर्चेत आहे अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अॅक्टिव्ह असते. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलंय. मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे. चंद्रमुखी चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फॉलविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. अमृताचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. अमृता खानविलकर ही मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. चंद्रमुखी या सिनेमात अमृताने साकारलेल्या चंद्राचं साऱ्यांनीच कौतुक केलं.