बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने आपल्या कुटुंबासोबत होळी साजरी केली आहे. करिनाच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. करीनाच्या या फोटोंमध्ये करीना तिची मुलं तैमूर आणि जहांगीर सोबत होळी खेळताना दिसत आहे. करिनाचा मुलगा तैमूर हातात पिचकारी घेऊन होळी खेळताना दिसत आहे. मोठ्या भावाप्रमाणेच करिनाचा धाकटा मुलगा जहांगीरही होळी साजरी करत आहे. करीना कपूरचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. करीना कपूरचे चाहते तिच्या या फोटोंना प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.