करीनाला रंग आवडत नाहीत! कारण...

होळी हा सण आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना अनेक रंगात रंगवतात.

बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण, मनोरंजन विश्वात एक अशी सौंदर्यवती आहे, जिला होळीचे रंग अजिबात आवडत नाहीत.

होळी हा सण तसा प्रत्येकाला आवडतो. पण, बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जिला आधी होळी खूप आवडत होती, पण आता तिला रंगांचा तिटकारा आहे. ही अभिनेत्री आहे करीना कपूर

रीनाला आधी धुळवड साजरी करणे आवडायचे. मात्र, आता ती रंगांपासून दूर पळते. यामागचे कारण स्वतः अभिनेत्रीनेच सांगितले.

तैमूरच्या जन्मानंतर त्यांच्या घरी पुन्हा धुळवड साजरी केली जात आहे. पण, असे असूनही करीना मात्र रंगांपासून दूर पळते.

राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये होळी पार्टीचे आयोजन असायचे, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स सहभागी व्हायचे. तेव्हा, करीना कपूरला होळी खूप आवडायची.

ती तिचे आजोबा राज कपूर यांच्या खूप जवळ होती. बालपणी त्यांच्यासोबत होळी साजरी करायची. मात्र, त्यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबात होळी साजरी झाली.