कॉमेडियन भारती सिंह तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. छोट्या पडद्यावरील वेगवगेगळ्या कार्यक्रांमधून भारती प्रेक्षकांच्या भेटीस येते. लवकरच भारतीच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया हे आई- बाबा होणार आहेत. एका मुलाखतीमध्ये भारतीला जुळ्या मुलांबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला भारतीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. भारती आणि हर्ष हे सध्या 'हुनरबाज: देश की शान' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाचे परिणिती चोप्रा, करण जोहर आणि मिथून चक्रवर्ती हे परिक्षण करतात.