भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी जगभरात खूप लोकप्रिय आहे.
महेंद्रसिंह धोनी हा त्याच्या जर्सी क्रमांक 7 मुळंही खूप प्रसिद्ध आहे.
चेन्नई सुपर किंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सने एका आभासी संवाद कार्यक्रमात धोनीनं चाहत्यांशी गप्पा मारल्या.
त्यावेळी धोनीनं त्याच्या जर्सीमागील नंबर 7 यावर भाष्य केलं.
बऱ्याच लोकांना वाटते 7 हा माझ्यासाठी लकी नंबर आहे, पण मी अगदी साध्या कारणामुळं हा क्रमांक निवडलाय- धोनी7 हा एक असा क्रमांक आहे, जो माझ्या हृदयाच्या जवळ आहे- धोनी
बऱ्याच लोकांना वाटते 7 हा माझ्यासाठी लकी नंबर आहे, पण मी अगदी साध्या कारणामुळं हा क्रमांक निवडलाय- धोनी कारण माझा जन्म 7 जुलैला झालाय. सातव्या महिन्यातील सातवा दिवस असल्यानं मी तोच निवडला- धोनी
महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करीत आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईनं चार ट्रॉफी जिंकल्या आहेत.