टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल आयपीएलच्या मैदानातही धमाकेदार खेळी करताना दिसून येतो. आयपीएलमध्ये धोनीच्या खांद्यावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कर्णधार पदाची धुरा आहे. ही जबाबदारीही धोनी यशस्वीरित्या पार पाडताना दिसतो. चेन्नई सुपर किंग्स (CSK)चा कर्णधार एमएस धोनीनं खुलासा केला आहे की, 'नंबर 7' त्याच्या फार जवळचा आहे. कारण त्याचा जन्म 7 जुलै रोजी झाला होता. त्यामुळेच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. हा नंबर त्यानं कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडून निवडलेला नाही. धोनीनं जेव्हापासून क्रिकेटमध्ये आपला आंतरराष्ट्रीय डेब्यु केला आहे, तेव्हापासूनच त्याच्या जर्सीचा नंबर 7 आहे. धोनीमुळेच 'नंबर 7' हा अनेक चाहत्यांचा आवडता नंबर झाला आहे. (photo:mahi7781/ig)