करण जोहर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहरने आज खास पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. करणचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान करणने वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी सिनेमासंदर्भात माहिती दिली आहे. करणचा 50 वा वाढदिवस खूपच खास आहे. करण लवकरच एका सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. करणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.