'कपिल शर्मा: आय एम नॉट डन येट' हा नेटफ्लिक्सवरील नवा शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या शोमध्ये कपिल वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतो. या शोमध्ये कपिलनं मेंटल हेल्थबद्दल देखील लोकांना सांगितले. तो म्हणाला की त्याच्या चेहऱ्यावरील हास्य हे गायब झाले होते. पुढे कपिल म्हणाला, 'एक शो जिंकल्यानंतर मला असं वाटलं की मी खूप मोठा झालोय. पण जग खूप मोठे आहे. एकदा मला असे वाटले की अजूनही मला आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत.' कपिलचा 'कपिल शर्मा: आय एम नॉट डन स्टिल' हा शो 28 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. 23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे.