मराठीतला पहिला ‘झोम्बी’पट, ‘झोंबिवली’ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती! 'झोंबिवली' (Zombivali) हा या संकल्पनेवर आधारीत मराठीतील पहिला हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बुधवारी (26 जानेवारी) राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मराठीतल्या पहिल्यावहिल्या झोम्बी’पटाला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच वर्दळ पाहायला मिळाली. जुलै 2020 मध्ये सारेगामाने 'झोंबिवली' या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती.