ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत भारत आणि फिलिपिन्समध्ये करार झाला आहे.
फिलिपिन्सचे संरक्षण मंत्रालय आणि फिलिपिन्स नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि मनिला येथील भारताचे राजदूत आणि ब्रह्मोस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
हा करार भारताकडून सुमारे 37.50 दशलक्ष डॉलर मध्ये झाला आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राची समुद्रातून प्रक्षेपित केलेली अँटी शिप क्रूझ क्षेपणास्त्र आवृत्ती फिलिपाईन्सला दिली जात आहे.
चीन आणि फिलिपाईन्समध्ये समुद्री भागात गेल्या काही महिन्यांपासून तणाव वाढला आहे.
फिलिपाईन्स स्वतःचा दावा करत असलेल्या समुद्रात अनेक महिन्यांपासून चिनी जहाजे तळ ठोकून आहेत.
फिलिपाईन्सने सर्व प्रयत्न करूनही चिनी जहाज माघार घ्यायला तयार नाहीत.
अशा परिस्थितीत भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे घेऊन फिलिपाईन्स आपले नौदल अधिक शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या करारानंतर फिलिपाईन्सच्या नौदलाची ताकद लक्षणीय वाढणार आहे.
ब्रह्मोस हे जगातील सर्वात जलद सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. 2.5 टन वजनाचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र 290 किमी परिसरात ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मारा करतं.