'कांतारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स कोट्यवधींची कमाई केली आहे. धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत आणि अल्लू अर्जुन या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुननं देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कांतारा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट चार नोव्हेंबरला रिलीज होणार असं म्हटलं जात होतं. निर्माता कार्तिक गौडा (Karthik Gowda) यांनी कांतारा प्रतिक्रिया दिली आहे. निर्माता कार्तिक गौडा यांनी एक ट्वीट शेअर करुन कांताराच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली आहे. कार्तिक गौडा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'ही चुकीची बातमी आहे. जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल तेव्हा आम्ही तुम्हाला माहिती देऊ. कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे. कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे.