बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी आपल्या स्पष्टवक्त्या वक्तव्यांमुळे, तर कधी तिच्या चित्रपटांमुळे कंगनाने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, यावेळी ती तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. कंगनाच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चाहत्यांमध्ये चर्चा आहे. सध्या कंगना तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'धाकड'मुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट आज म्हणजेच शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच कंगनाने तिचा बोल्ड लूकही चाहत्यांमध्ये शेअर केला आहे. यामध्ये तीने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड गाऊन परिधान केलेला दिसत आहे. फोटोंमध्ये कंगनाचा स्वॅग पाहायला मिळत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आणि तिचे केस बनमध्ये बांधले आहेत.