बॉलिवूड गायिका कनिका कपूर आज (20 मे) दुसऱ्यांदा लग्नगाठीत अडकत आहे कनिका तिचा बॉयफ्रेंड आणि लंडनस्थित बिझनेसमन गौतमसोबत सप्तपदी घेणार आहे. तिने अलीकडेच तिच्या मेंदी फंक्शनमधील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कनिकाने त्याला एक कॅप्शन दिले आहे. ती लिहिते, 'जी (G) माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे.' कनिका कपूरने या सोहळ्यासाठी तिचा लूक अतिशय साधा ठेवला होता. तिने चोकर नेकपीससह लहेंग्याशी मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या. मेंदी सेरेमनीत कनिकाने पेस्टल ग्रीन लेहेंग्यासह फ्लोरल ज्वेलरी घातलेली दिसतेय. यावेळी गौतमने कनिकाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले फोटोंमध्ये कनिका अतिशय सुंदर दिसत आहे. तर गौतम यावेळी बीज कलरचा कुर्ता-पायजामात दिसला.