मान्सूनची चाहूल लागल्याने आंबोलीत धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंबोली परिसरात आल्हाददायक वातावरण आहे. आंबोलीत दाट धुकं सुरू झालं की मान्सूनची चाहूल असल्याचं जाणकारांचं मत आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून सिंधुदुर्गातील आंबोलीची ओळख आहे पावसांच्या सरीमुळे महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याचे दिसू लागले. सातारा शहर, महाबळेश्वर, वाई परिसरात पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरली. वेण्णालेक परिसरातील तापमानात कमालीची घट झाली. सुट्ट्यांसाठी आलेले पर्यटक या वातावरणाचा आनंद लुटत आहेत.