बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत सध्या 'इमरजंसी' (Emergency) सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगना सध्या या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला डेंग्यू झाला आहे. पण कंगना विश्रांती घेण्याऐवजी 'इमर्जन्सी'चे शूटिंग पूर्ण करत आहे. 'इमरजंसी' या सिनेमाची निर्मिती मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली होत आहे. त्यामुळे कंगनाला डेंग्यू झाल्याची माहिती मणिकर्णिका फिल्म्सच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून देण्यात आली आहे. 'इमरजंसी' या सिनेमात कंगना रनौत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'इमरजंसी' हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'इमरजंसी' सिनेमा 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या अंतर्गत आणीबाणीवर आधारित आहे.