बॉलीवुड अभिनेत्रींमधील एक आघाडीचं नाव म्हणजे जान्हवी कपूर सध्या गुड लोक जेरी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व्यस्त सर्वत्र प्रमोशनमध्ये जान्हवी दिसून येत आहे. सोशल मीडियावरही यासाठी ती तुफान अॅक्टिव्ह आहे. पण या सर्वातही फिटनेसवर तिचं लक्ष आहे. ती जीममध्ये घाम गाळत असल्याचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर येत असतात. यातून जान्हवी तिच्या फिटनेसवर किती लक्ष देते हे कळून येतं. जान्हवी एक फिटनेस आयकॉन आहे. जान्हवीच्या अभिनयासह फिटनेसही कमाल आहे. तिला भटकंतीचीही फार आवड असल्याचं दिसून येतं. तिच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.