साउथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी आज (8 ऑगस्ट) तिचा 31वा वाढदिवस साजरा करत आहे.



हंसिका मोटवानी आजघडीला साऊथ सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा असेल, पण तिने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.



तिने 'शाका लाका बूम बूम' या टीव्ही मालिकेद्वारे बालकलाकार म्हणून अभिनय विश्वात पदार्पण केले होते.



हंसिकाने बाल कलाकार म्हणूनही चित्रपटांमध्ये काम केले आहे.



बालकलाकार म्हणून तिला खूप पसंत केले गेले आणि तिला चाहत्यांचे खूप प्रेमही मिळाले.



हंसिका मोटवानीने 'सोन परी', 'करिश्मा का करिश्मा', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले.



2007मध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तिने साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले. अभिनेत्रीने दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांच्यासोबत 'देसमुदुरू' चित्रपटात काम केले होते.



तिने 'वेलायुधम', 'ओरू काल ओरू कानडी' आणि ‘सिंघम’ यांसारख्या तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.



हंसिकाने हिमेश रेशमियाच्या आप का सुरुर या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.



यानंतर हंसिका गोविंदासोबत 'मनी है तो हनी है' चित्रपटात दिसली होती.