कंगना रनौतचा 'धाकड' सुपरफ्लॉप ठरलाय. रीलिजच्या आठव्या दिवशी फक्त 20 तिकिटांची विक्री झाली. धाकडचे बजेट 90 कोटी आहे. पहिल्या दिवशी केवळ 1 कोटी रुपये कमावले. 'भूल भुलैया 2'चा फटका धाकडला बसला. 'धाकड' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे. यामध्ये कंगनाने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. यात कंगनाचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला.