आपल्या बोल्ड लूकने नेहमीच सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या उर्फी जावेदने पहिल्यांदाच आपलं दुःख शेअर केलं आहे. उर्फी जावेद आजारी पडली आहे आणि ती एका नव्या संकटात सापडली आहे. उर्फीने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. उर्फी जावेदने तिच्या आजारपणाची कहाणी सांगितली आहे, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. उर्फी जावेद आपल्या असामान्य शैलीमुळे चर्चेत असते. यावेळी तिने एक अशी दुःखद गोष्ट पोस्ट केली आहे की सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे. या फोटोत उर्फीने तिचा पूर्ण चेहरा दाखवला नसून, अर्धा चेहरा दाखवून तिने आपले दु:ख शेअर केले आहे. उर्फीने चेहऱ्यावर सूज येण्याचे कारणही सांगितले