साऊथ इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री पूजा हेगडे लाइमलाइटचा भाग राहिली आहे. कधी तिच्या चित्रपटांसाठी तर कधी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे पूजा चर्चेत असते. पूजाला प्रसिद्धीझोतात राहणे चांगलेच ठाऊक आहे. फॅशनसोबतच सौंदर्याच्या बाबतीतही पूजा प्रसिद्ध आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही पूजा हेगडेचे चाहते आहेत. पूजाचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. हे चाहते तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत असात. मुली तिच्या सुंदर आणि चमकदार त्वचेचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पूजाला डाएट करायला अजिबात आवडत नाही. पूजा जे काही खाते ते घरीच खाते. फळे, हिरव्या भाज्या आणि पौष्टिक गोष्टींचा पूजाच्या आहारात समावेश आहे. पूजा तेलकट पदार्थ खाणे टाळते कारण ते त्वचेला तसेच आरोग्यालाही हानी पोहोचवते.