अभिनेत्री साई पल्लवी तिच्या साध्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ‘प्रेमम’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यात साकारलेली 'मलर'ची भूमिका अनेकांच्या काळजात घर करुन आहे. साईने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेत. साई पल्लवीने तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं आहे. साडीमध्ये साई पल्लवीचे सौंदर्य अधिकच खुलतं. मारी सारखा सुपरहिट चित्रपटही दिला आहे. साई पल्लवी ही नेहमी मेक-अप विना दिसते. चित्रपटातही काम करताना अनेकदा मेक-अपविना दिसते. साई सौंदर्यप्रसाधनाची जाहिरात करत नाही.