बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतने (Kangana Ranaut) लाल किल्ल्यावर रावण दहन केलं आहे.

50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला हा मान मिळाला आहे.

कंगनाने नवी दिल्लीतील लव कुश रामलीला इथे रावण दहन केलं आहे.

'पंगाक्वीन'ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने लिहिलं आहे,आज मला दिल्लीच्या प्रसिद्ध लवकुश राम लीलामध्ये रावण दहन करण्याचे सौभाग्य मिळाले.

ज्याप्रमाणे श्रीरामांनी रावणाशी युद्ध केले, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक राक्षसांशी लढतात. जय श्री राम,”

अभिनेत्रीची निवड करण्याबद्दल लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह म्हणाले,

गेल्या महिन्यात संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकालानंतर समितीने कंगना रणौतच्या हस्ते रावण दहन करण्याचा निर्णय घेतला

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन सिंह म्हणाले की,फिल्मस्टार असो की राजकारणी दरवर्षी आमच्या कार्यक्रमात व्हीआयपी पाहुणे असतात.

आमच्या कार्यक्रमाच्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिलेने रावण दहन केले आहे.