पक्ष, संघटना, जात, धर्म याचा कोणताच प्रश्न नाही. महाराष्ट्रातील कोणताच तरुण व्यसनाधीन झाला नाही पाहीजे, अशी माझी भूमिका आहे. हा महाराष्ट्र ड्रग्स मुक्त झाला पाहिजे. नाशिकला एवढ्या कोटींचा साठा मिळत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळतोय का, असे म्हणत दादा भुसेंवर टीका केली. 10 दिवसांपासून मला नोटीस पाठवणारे मला अंधारात सेटलमेंटची भाषा करतायत. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू, अशी ग्रामीण भागात म्हण आहे. गृहमंत्री साहेब ललित पाटील आमचा होता अशी बदमाशी का करतायत? 9 महिने त्याला कोणता आजार होता ? गरोदर महिला सोडून कोणालाच एवढे दिवस ठेवत नाहीत. काही जण देवेंद्र फडणवीस यांना चाणक्या म्हणतात, पण मला हे पटत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवले त्यांनी फक्त जमवले. देवेंद्र फडणवीस मोठ्या महाशक्तीचे नेते आहेत. तुम्ही लोकांना जमवले नाही, तोडले. तुमच्याकडे सगळे काही असताना तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादीमधून उचलेगिरी का करतात ? तुमचा मोठा पक्ष आहे तर आमच्याकडील रेडीमेल माल का उचलता. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवला आहे. महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचे खाऊन मराठी लेकींना धमकावण्याचे काम एका अमराठी माणसाने केले. सुषमा अंधारे म्हणजे अंगार भंगार नाही, शिस्तीत राहा, उडू नको. चळवळीतून आलेली मुलगी आहे. धमक्यांना घाबरत नाही. सुषमा अंधारे चळवळीतून आली आहे, बाळासाहेबांचं बाळकडू आहे, आमदार, कोट्यवधीशांना तुम्ही नडला असाल पण मध्यमवर्गीयांना कधी नडला नसाल.