बॉलिवूड अभिनेत्री काजोलने अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. आता काजोल ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिची 'द गुड वाइफ' (The Good Wife) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द गुड वाइफ - प्यार, कानून, धोका' या वेबसीरिजमध्ये काजोल मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज 'द गुड वाइफ' या अमेरिकन वेबसीरिजचं भारतीय रुपांतर आहे. काजोलने जुलै महिन्यात एक व्हिडीओ शेअर करत या वेबसीरिजची घोषणा केली होती. 'द गुड वाइफ' या वेबसीरिजमध्ये काजोलचा एक सामान्य गृहिणी ते वकीलापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. वेबसीरिजसाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. काजोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.