अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने वनपिस, खड्यांचे दागिने अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 'She remembered who she was and game changed', असं कॅप्शन प्राजक्तानं या फोटोला दिले आहेत. प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. प्राजक्ताच्या फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. प्राजक्ता तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात. प्राजक्ताच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.