अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट आज रिलीज झाला.
चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबतच मिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
अयान मुखर्जीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
सध्या ट्विटरवर काही नेटकरी ब्रह्मास्त्र चित्रपटाबद्दल ट्वीट शेअर करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे.
एका युझरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'चित्रपट पाहिला. कथा आवडली नाही. चित्रपटातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शाहरुख खानचा कॅमिओ. जो केवळ 20-25 मिनिटांचा आहे.'
एका युझरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'चित्रपट पाहिला. कथा आवडली नाही. चित्रपटातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शाहरुख खानचा कॅमिओ. जो केवळ 20-25 मिनिटांचा आहे.'
एका युझरनं ट्वीट करुन लिहिलं, 'आलिया आणि रणबीरची केमिस्ट्री चांगली आहे. हा हॉलिवूड लेव्हलचा चित्रपट आहे.'
ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले.
आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.