बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 2022 हे वर्ष खूप गाजवलं. आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर आलिया भट्ट चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली. आता लवकरच आलिया आई होणार आहे. मातृत्वाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आलिया भट्ट इंस्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता आलियाच्या फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन झाली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो नेहमीच शेअर करत असते. नुकतेच तिने असेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नन्सी ग्लो दिसत आहे. आलियाने पुन्हा एकदा बेबी बंप फ्लाँट केला आहे. आज आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत होते. अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीजआधीच या चित्रपटाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे.