प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच आई होणार आहे.

काजलनं तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

अनेक वेळा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत

आता नुकताच एक खास व्हिडीओ काजलने शेअर केला आहे. काजल या व्हिडीओमध्ये वर्क-आऊट करताना दिसत आहे.

काजलनं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी नेहमी अॅक्टिव्ह राहते.

प्रेग्नेंसी हा वेगळा आनंद आहे. ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी अॅरोबिक आणि स्ट्रेंथ कंडिशनिंग एक्सरसाइज केला पाहिजे. ' अनेक नेटकऱ्यांनी काजलच्या या फोटोला कमेंट्स केल्या आहेत.

एका नेटकऱ्यानं काजलच्या या फोटोला कमेंट केली, 'मला तुझा अभिमान वाटतो.' आठ लाख पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

2020 मध्ये काजलनं गौतम किचलू (Gautam Kitchlu) सोबत लग्नगाठ बांधली.

काजलनं 2004 मध्ये 'क्यों हो गया ना' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं सिंघम, स्पेशल 26 आणि दो लफ्जो या हिट चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काजलनं काम केले आहे.