आज महाशिवरात्री आज आम्ही तुम्हला दर्शन घडवणार आहोत देशातील सर्वाधिक उंचीचे शिवमंदिराचं. हे शिवमंदिर वेरूळमधील श्री. विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात साकारले आहे. प्रत्यक्षात 60 फुटाचे शिवलिंग प्रतिकृतीचे मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. भारतातील सर्वात उंच शिवमंदिर आहे पिंडीसह संपूर्ण मंदिराचा रंग काळा आहे. आणि या एकाच शिवमंदिरात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे मंदिराचा परिसर 108 बाय 108 फूट आकाराचा असून जमिनीपासूनशिवलिंगाची उंची 60 फूट, तर मंदिराच्या छतापासून 40 फूट आहे. शाळुंका 38 फूट रुंद आहे. वेरूळ येथे देशातील सर्वात मोठे उभारलेल्या शिवलिंग मंदिराचे महाशिवरात्रीनिमित्त भक्तासाठी खुल होणार आहे.. तब्बल 23 वर्षांपासून मंदिराचं काम सुरू होत.